Tuesday, 22 November 2011

मैत्री......


खरंतर मैत्री ही कोणाशीही होऊ शकते.... त्याला काही वयाचा बंधन नसतं... या आशयाचा मी कॉलेजमध्ये असताना एक लेख लिहिला होता. आणि तो माझ्या फ्रेंड्सना खूपच आवडला होता... तो लेख खूप दिवस जपून ठेवला होता... नंतर आठवत नाही कुठे गेला.....
कॉलेजेमध्ये असताना आपण एका स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे असतो. आपल्याला  वाटेल ते करतो....
खरंतर आपण जे काही लिहितो ते आपल्या  फ्रेंड्सना नाही आवडलं तरच नवल.....

कॉलेजचे दिवस सर्वांनाच आवडतात...
सकाळी कॉलेजेला जायचे लेक्चर अटेंड करायचे, नंतर कॅन्टीनला खायचं, गप्पा मारत झाडाखाली बसायचं.
थंडीच्या दिवसात एखादी टीचर नाही आली तर मस्त ग्राउंड वर सकाळी सकाळी उन खात बसायचं..... काहीवेळेस तर नंतर मुडच नसायचा लेक्चरला जायचा, मग काय आम्ही मैत्रीनी पूर्ण कॉलेजेला चक्कर मारून गप्पा मारत फिरायचो आणि गप्पांचा विषय काहीही असायचे... सामाजिक घडामोडीपासून ते घरातील घडामोडीन्पर्यंत. काहीवेळेस  मूड नसेल तर शांत बसून बाकी काय गप्पा मारताय हे ऐकत  बसायचं... पण खरच तेव्हा कसलाही कंटाळा यायचा नाही.....

एक गमतीशीर घटना सांगते.....
थंडीचे दिवस होते... खूप भूक लागली होती... मस्त गरम गरम  वडापाव घेऊन एका प्रायव्हेट बस मध्ये बसून खात होतो माझ्या वड्यात मोठा बटाटा आला मी तो काढला आणि खिडकीतून बाहेर भिरकावून लावला. तो बटाटा एका मुलाच्या चष्म्याला लागून खाली पडला... वाटल आता तो वरती येतो कि काय.... त्या मुलाने जाड भिंगाच्या चष्म्यातून वर खिडकी कडे पहिले न पाहिल्यासारखे केले. त्यावर माझी मैत्रीण म्हणाली बहुतेक  बटाट्याला बटाटा दिसलाच  नाही....त्यावर खूपच हसलो.. नंतर तो केव्हाही दिसला कि ए बटाटा चालला बघ.. म्हणून हसायचो.... अजूनही आठवलं कि हसू येत...

एकेदिवशी हॉटेल मध्ये चहा पिण्यासाठी जाऊन बसलो... मला एक कल्पना सुचली मी माझी मैत्रीनला म्हणाले नको चहा नको नवीन थंडगार पेय आहे ते घेऊ या... मी ड्युक्सचा उचार तिला डक असा सांगितला... ती ऑर्डर करायला गेली आणि तिने डक आहे विचारले त्याबरोबर तिच्याशेजारी मुलं होती ती हसायला लागली इकडे आम्ही पण हसत होतो.. तो वेटर पण हसायला लागला अहो ताई असा काही नाही काय  पाहिजे तुम्हाला .... मी उठून गेले त्याला  ड्युक्स द्या सांगितलं... खूप मार खाल्ला त्या दिवशी तिच्याकडून......



सकाळी सकाळी आपल्याला  ग्राउंड वरची हिरवर दिसते तशी कॉलेजेमधली पण.....
आमच्या कॉलेजे मध्ये एक जोडी फेमस होती दुधावाल्याची... एक सुंदर तरुणी आणि तिचा प्रियकर दूधवाला.
तो रोज तिला सकाळी सायकलवर घेऊन यायचा... आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं हिला दुधवाला काय आवडतो..  आणि  तो ही इतका गबाळा.... हो गबाळा हाच शब्द बरोबर आहे... रोज एकच ड्रेस तोही मळलेला. एकदा तर त्याने गमतच केली... बहुतेक त्या दोघांचे भांडण झाले असावे... पिक्चर मध्ये कसे हिरो कॉलेजेच्या भिंतीवरून उडीमारून येतात तो तसा आला तिच्या मागे.. आणि तिचा हात धरून माफी मागत असावा... आम्ही सर्वच म्हणजे कॉलेजे मधील बरेचसे मुला मुली हे सगळं कॉलेजेच्या बिल्डीन्गमधून पाहून हसत होतो सकाळी सकाळी तिकीट न काढता रोमांटीक पिक्चर बघायला मिळाला. ती हिरोईन सारखी त्याचा हात झटकून निघून आली. तो वेडा तिच्या मागे मागे क्लासरूम पर्यंत आला पण ती सरळ क्लासरूम मध्ये लेक्चर ला बसली...

 लेक्चर संपले....
आम्ही सर्व बाहेर आलो तर हा वेडा मुलगा बाहेरच उभा होता... तेवढ्यात ती पण बाहेर आली त्याला पाहून सरळ निघून गेली.. हा लगेच तिच्या मागे मागे गेला... काय म्हणावं या प्रेमाला....
काही दिवसांनी ते दिसलेच नाही....


कॉलेजेचे दिवस आपल्याला आनंद देऊन जातात..... पुन्हा तसे आनंदाचे क्षण येत नाही असा नाही...
पण त्या क्षणांना या आनंदाची सर नाही असा म्हणायला हरकत नाही.....

बाय फ्रेंड्स,
हसा आणि हसवत राहा, सगळ्यांना आनंद देत राहा.....