नमस्कार,
शुभ रात्री,
रातीचे साडे बारा वाजलेत आणि माझ्या डोक्यात एक नवीन कल्पना सुचली कि, मी काहीतरी लिहाव.
वाटलं पत्र लिहावं आपणच आपल्याला....
नंतर वाटलं नको काहीतरी नवीन करूया... ब्लॉगवर लिहिलं तर ............
लगेच ब्लोग तयार केला. आणि नाव दिलं पण - बी पॉंझीतीव आणि थिंक क्रिएअतिव. मस्तय ना! एखादी गोष्ट सुचते आणि आपण ती लगेच करतो, किती आनंद देणारी कल्पना आहे ही.
'आनंद' ही गोष्ट किती महत्वाची आहे आपल्या जीवनात. सगळ्यांच्याच आयुष्यात प्रत्येक क्षणी असतेच असे नाही. म्हणुनतर आपण आनंद मिळवण्यासाठी धडपडत असतो. आपल्या सभोवतालच वातावरण पॉंझीतीव असाव अस सगळ्यानाचं वाटत असतं. आणि त्यासाठी आपण तसे प्रयत्नही करत असतो. कारण जर आपण पॉंझीतीव असलो तर आपले विचार पण नक्कीच चांगले होण्यास मदत होते. सभोवतालचे वातावरण आनंदी ठेवण्यास मदत होते. तुम्हाला वाटत असेल मी का बर हे सांगत असेल.......
मला आनंदी राहायला खूप आवडते आणि दुसर्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही बघायलाही खूप आवडतो. जर आपण आनंदी असू तरच आपल्या सभोवतालचे लोक आनंदी राहू शकतील. आनंद वाटण्याने वाढत जातो. हे कायम लक्षात ठेवले पाहिजे..........
मी परत नवीन विषयावर लिहिणार आहे तुमच्याशी संवाद साधणार आहे
तोपर्यंत बी पॉंझीतीव आणि थिंक क्रिएअतिव.
हसा आणि हसवत राहा, दुसर्यांना आनंद देत राहा.
कविता नांदुर्डीकर
This comment has been removed by the author.
ReplyDeleteही तिच कविता आहे जिला मी भेटलो ??
ReplyDeleteकिती छान वाटतय हे सगळ वाचताना, खूप सुंदर कल्पना आहे ..
वाट पाहिल मी तुझ्या पूढच्या ब्लॉग ची
मला आवडेल तुझे ब्लॉग्स वाचयला .. आणि हो मी
'o' possitive aahe .. :P
विलास साळवी !! :)
आयला...
ReplyDeleteएकदम ब्लॅाग वगैरे लिहायला लागलीस....मस्तच....
लवकर पुढची पोस्ट टाक....वाट बघतोय...
BTW मी पण 'o' positive आहे.